मालवण – गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये. विनाकारण गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबविणे गरजेचे आहे. नागरिकांनी गर्दी न केल्यास कोरोनाचे संक्रमण थांबू शकते. त्यामुळे किराणा दुकान तसेच अत्यावश्यक सेवा असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी टाळावी. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. गरज असल्यास घराबाहेर पडा. विनाकारण बाहेर पडून गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

‘कोरोना’ महामारीच्या लढाईविरोधात यशस्वी होण्याचा महानिर्धार करण्यात आल्याने यावर्षीच्या गुढीपाडवा उत्सवावरही मर्यादा आल्या आहेत. गुढीपाडवा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. उंच गुढी उभारण्याची स्पर्धा कोणीही करू नये. जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.