देवबाग समुद्रात उलटली बोट, दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवबाग येथे बोटिंग सफर करत असताना पर्यटक बोट समुद्रात पलटी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये 9 पर्यटक बुडाले होते. ज्यामधील 1 पर्यटकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे कल्याण येथील पर्यटक मालवण देवबाग येथे पर्यटनासाठी आले होते. हे पर्यटक बोटिंगचा आनंद घेण्यासाठी समुद्रात गेले असताना समुद्रात अचानक वाढलेल्या वाऱ्यांमुळे त्यांची बोट उलटली. यामध्ये 5 महिला 3 लहान मुले व एक पुरुष असे 9 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यावेळी बोटिंग व्यावसायिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु करत सर्व 9 पर्यटकांना पाण्यातून बाहेत काढून रुग्णालयात दाखल केले. बुडालेल्या पर्यटकांपैकी माया आंनद माने या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठ पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.