
सामना प्रतिनिधी। मालवण
आचरा देऊळ वाडी येथे विशाल अशोक घाडी (24) या युवकाने दारूच्या नशेत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही.
विशाल मजुरीचे काम करत होता. पण त्याला दारूचे व्यसन लागले होते. विशालचा भाऊ मुंबईला राहतो. तो आजारी असल्याने त्याची आई मुंबईला गेली होती. विशाल एकटाच घरी होता. रविवारी सकाळी तो बाहेर गेला होता. येताना तो मद्यपान करून आला. त्यानंतर तो घराबाहेर पडलाच नाही. संध्याकाळचे ७ वाजले तरी विशाल घरातून बाहेर न आल्याने शेजारी राहणारी त्याची चुलत बहीण त्याला पाहण्यासाठी गेली . तेव्हा स्वयंपाक घरातील लाकडी बारला विशालचा गळफास घेतलेल्या अवस्थेतीतील लटकलेला मृतदेह तिला आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले.
सोमवारी दुपारी आचरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात विशाल वर अंत्यसंस्कार करण्यात आले.






























































