खरंच, ममतांची कमाल आहे! ‘यास’ चक्रीवादळाचा धोका! दीदी रात्रभर मंत्रालयातच ठाण मांडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळानंतर अवघ्या आठ दिवसांनी हिंदुस्थानच्या पूर्व किनारपट्टीवर भयंकर ‘यास’ चक्रीवादळ उद्या (दि. 26) धडकणार आहे. ताशी 155 ते 185 कि. मी. प्रतितास वेगाने हे चक्रीवादळ घोंगावणार असून, पश्चिम बंगाल आणि ओडिशात हायअलर्ट जारी केला आहे. दरम्यान, वादळात उपाययोजना करण्यासाठी, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रात्रभर मंत्रालयात ठाण मांडून बसणार आहेत.

मंगळवारी संध्याकाळीच बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळाने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ओडिशाच्या भद्रक जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील धामरा बंदरावर ‘यास’ चक्रीवादळाचा लँड फॉल होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे.

  • 54 हजार अधिकारी, पोलीस, लष्करी जवान, होमगार्डस तैनात केले आहे. किनारपट्टीलगतच्या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बालासोरकडे रवाना झाले आहेत. किनारपट्टी भागातील 50 हजारांवर नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.