Video – पोलिसांना घाण शिव्या देणाऱ्याला केला’सरळ’

मुलुंडमध्ये कोरोना व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका नागरिकाला दंड भरण्यास सांगितले असता त्याने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ गेली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या व्यक्तीने माफी मागितली.


जतीन सतरा हा 32 वर्षीय व्यक्ती दुकानदार असून त्याने मुलुंडच्या आरआरटी मार्गावर नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. तेव्हा ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ यांनी जतीनला गाडी हटवण्यास सांगितली. तेव्हा जतीन याने वाघ यांच्याशी हुज्ज घातली आणि शिवीगाळ केली. जतीनने फक्त वाहतुकीचेच नाही तर कोविड नियमांचेही उल्लंघन केले. पोलिसांनी या प्रकरणी जतीनला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या