भायखळय़ात पाच लाखांच्या एमडीसह घडय़ाळ विक्रेत्याला पकडले

44

सामना प्रतिनिधी । मुंबई

घडय़ाळ विक्री व्यवसायाच्या पडद्याआड राहून ड्रग्जचा काळाबाजार करणाऱया एका सप्लायरला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने रंगेहाथ पकडले. कासिम मोहम्मद सिद्दिकी असे त्याचे नाव असून त्याला भायखळा येथे पाच लाखांच्या एमडीसह पकडण्यात आले.

भायखळा परिसरात कासिम नावाचा ड्रग्ज सप्लायर एमडीची डिलेव्हरी देण्यासाठी येणार असल्याची खबर वरळी युनिटला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कदम आणि त्यांचे पथक आज पहाटेच्या सुमारास भायखळा परिसरात गस्त घालत असताना अग्निशमन दल कार्यालयाच्या विरुद्ध बाजूला कासिम नावाचा इसम संशयास्पद हालचाल करताना कदम यांच्या नजरेस पडला. त्यामुळे कासिमला ताब्यात घेऊन त्याच्या जवळच्या सामानाची तपासणी केली असता त्यात 250 ग्रॅम वजनाचा व पाच लाखांचा एमडीचा साठा सापडला.

आपली प्रतिक्रिया द्या