एका जिद्दीने त्याला बनवले अब्जाधीश! 30 वर्षे खरेदी केले एकाच नंबरचे लॉटरीचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही व्यक्ती त्यांच्या ठरवलेल्या गोष्टींवर ठाम राहतात. जिद्दीने ते अस काहीतरी करत राहतात की एक ना एक दिवस यशस्वी होण्याची त्यांना आशा असते. अमेरिकेतील मिशिगनमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका 61 वर्षीय व्यक्तीला लॉटरीमध्ये जॅकपॉट लागला असून ते अब्जाधीश झाले आहेत. विशेष म्हणजे 30 वर्षांपासून ते एकाच नंबरचे लॉटरीचे तिकीट खरेदी करायचे.

लॉटरी अधिकाऱयांशी बोलताना ते म्हणाले, 1991 पासून मी एकाच नंबरचे लॉटरीचे तिकीट खरेदी करायचो. अनेकदा नंबर बदलण्याचा विचार मनात आला पण नंतर जिद्दीने याच नंबरवर मी ठाम राहिलो. अखेर याच नंबरमुळे माझे भाग्य उजळले आहे.