चार वर्षांपासून मॉलमध्ये राहत होता, एका चुकीमुळे झाला भांडाफोड

एक व्यक्ती शॉपिंग सेंटरमध्ये गेल्या चार वर्षांपासून सीक्रेट फ्लॅट बनवून राहत होती. आश्चर्य म्हणजे चार वर्षात एकदाही कोणाला त्याची भनक देखिल लागली नाही. आता मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्याचा भांडाफोड झाला आहे.

मायकल टाउनसेंड असे या व्यक्तीचे नाव आहे. तो व्यवसायाने एक आर्टिस्ट असून तो 52 वर्षांचा आहे. ही घटना अमेरिकेच्या रोड आयलॅण्ड येथील आहे. मायकल हा शहराच्या ऐतिहासिक मिल इमारतीत राहत होता. त्या इमारतीला 2003 साली एका बिल्डरने घेतले आणि मायकल बेघर झाला. बिल्डरने सांगितले की, इमारत पुर्नविकास करावा लागणार, त्यानंतर मायकल याच इमारतीत अन्य प्रोजेक्ट्स पाहायला गेला. ज्यामध्ये प्रोविडेंस प्लेस मॉलचाही समावेश होता. त्याला त्यावेळी कळले की मॉलमध्ये एक सिक्रेट जागा आहे, ती कोणीच वापरत नव्हते. त्याचवेळी आर्टिस्ट म्हणून ती जागा त्याने चांगली सुधारण्याची जबाबदारी घेतली. तो तिथे चार वर्ष राहिला. दरम्यान 2007 मध्ये त्याचा भांडाफोड झाला.

मायकलच्या म्हणण्यानुसार, त्या इमारतीत तो आधीपासून राहत होता. तेव्हाचे भाडे 350 डॉलर होते आणि ते वाढून 2000 डॉलर झाले आहे. त्यामुळे इमारतीचे काम सुरु असताना स्वत:लाही काहीतरी वेगळे प्लॅन केले होते. त्याला दोन वर्ष सिटी मिटिंग्स बोलावले जायचेय तिथे तो अनेक बिल्डर्सना भेटला आणि त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते समजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिल्डरकडून कोणत्या गोष्टी राहिल्या त्या विकसित करण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्याने मानले. हिच गोष्ट लक्षात ठेऊन जेव्हा तो मॉलचे काम पाहायला गेला, त्यावेळी तिथे त्याला एक पडीक जागा दिसली आणि तेव्हा ती जागा विकसित करण्याची जबाबदारी घेतली.

हा मॉल 12 ऐकर जागेत विस्तारला असून तो 9 मजली आहे, याच दरम्यान मायकलने 750 स्क्वेअर फिट मध्ये पसरलेल्या या सीक्रेट जागेला विकसित करायला सुरुवात केली. याला खिडक्या नव्ह्त्या. त्यात त्याने छोटसं घर बनवलं. त्यात त्याने गरजेच्या वस्तू ठेवल्या मात्र मायकलकडून एक चूक झाली. त्याने एका चीनच्या आर्टिस्टला आपलं घर दाखवायला घेऊन आला. याच दरम्यान कोणी त्याला पाहिले. त्यावेळी मायकल घरी नव्हता. त्यानंतर असे झाले की, मायकल घरीच होता, त्याचवेळी पेट्रोलिंगवाले आले, त्यावेळी त्याला ही जागा खाली करुन जावे लागले.