दारू पिताना भांडण झाल्याने मित्रावर बलात्कार केला, पीडीत तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानातील जोधपूरमधील रुडनाडा भागात एक विकृत आणि किळसवाणी घटना घडली आहे. दारू प्यायला बसलेल्या मित्रांमध्ये भांडण झाल्याने एका मित्राने दुसऱ्यावर बलात्कार केला. यामध्ये पीडीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिसलपूर विभागातील या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला असून पीडीत तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.

23 तारखेला भैराराम आणि फुसाराम हे दारू प्यायला बसले होते. रात्री 10 पासून त्यांनी प्यायला सुरुवात केली ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत ते दारू पीत होते. दारू भयानक चढल्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं, दोघांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. हाणामारीमध्ये भैराराम हा फुसारामपेक्षा वरचढ ठरला. फुसाराम हा गलितगात्र झाल्याचे पाहिल्यानंतर भैरारामला आणखी चेव चढला. त्याने फुसारामला धडा शिकवण्यासाठी त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. हाणामारी आणि बलात्कारामुळे फुसारामचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी भैरारामच्या विरोधात आयपीसीचे कलम 377 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.