
सामना ऑनलाईन । लातूर
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात तिघा अज्ञातांनी एका दुचाकीस्वाराला भर रस्त्यात अडवून भोसकल्याची घटना घडली आहे. संतोष वैजनाथ पवार असं या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो उदगीर मधील देगलूर रोड परिसरात राहतात. या प्रकरणी तिघां अज्ञातांविरोधात उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष हा बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या स्कुटरवरुन घराकडे जात असताना, थोडया अंतरावर तिघा अज्ञातांनी त्याला थांबवले. स्कुटर उभी करताच एकाने थेट चाकूने भोसकले. गंभीर जखमी अवस्थेत संतोषला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलीसांनी तिघा अज्ञात विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
































































