
सामना ऑनलाईन । कोलकाता
पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर रविवारी ५० वर्षाच्या व्यक्तिने रेल्वेत बसलेल्या महिलांच्या डब्यासमोर हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे. यानंतर महिलांच्या डब्यातील २० वर्षीय तरुणीने या विकृत माणसाचा व्हिडीओ फेसबुक लाईव्ह केला होता.
बंडेल रेल्वेस्थानकावर एका ५० वर्षीय व्यक्तीने रविवारी दुपारी १.१५ वाजताच्या दरम्यान महिलांच्या डब्याजवळ हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. पण, रेल्वे स्थानकावरील इतरांनी या माणसाकडे जास्त लक्ष दिले नाही. मात्र, महिलांच्या डब्यातील २० वर्षीय तरुणीन या व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिलं आणि तरुणीने या व्यक्तीचं कृत्य फेसबुक लाईव्ह केलं. फेसबुक लाईव्ह झाल्यनंतर बंडेल रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना या माणसाबद्दल सूचना देण्यासाठी ती उठली. पण, तिला उठलेले पाहताच तो विकृत पसार झाला.
दिल्लीत विकृताचं चालत्या बसमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून
तरुणीने बंडेल रेल्वे स्थानकावर उतरून रेल्वे पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं. तसेच फेसबुकवर लाईव्ह केलेला व्हिडीओसुद्धा तिने दाखवला. या पुराव्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करत या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.



























































