मंचर बाजार समितीत कांद्यांचा भाव वधारला, गाठला सहा महिन्यातील उच्चांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंचर बाजार समितीत मागील सहा महिन्याच्या तुलनेत आज झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली असून आज कांद्याला उच्चांकी 301 रूपये असा बाजार भाव मिळाल्याची माहिती वसंतराव भालेराव यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर मुख्य बाजार आवारात रविवार दि. 8 ऑक्टोंबर रोजी18000 ते 20000 हजार कांदा पिशव्याची आवक झाली. कांद्याला रुपये 301 असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. खेड, शिरूर व आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावामधून मंचर बाजारात कांद्याची आवक होत असते. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी कांद्याचे लिलाव होत असतात.

आज सुपर लॉट 1 नंबर गोळ्या कांद्यास रुपये 270 ते 301/- सुपर गोळे कांदे 1 नंबर रुपये 230 ते 260/- सुपर मिडीयम 2 नंबर कांद्यास 220 ते 260/- गोल्टी कांद्यास रुपये 130 ते 180/- बदला कांद्यास रुपये 40 ते 150 असा बाजार भाव मिळाला.

परराज्यातून कांद्याच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे बाजारभावात वाढ असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती वसंत भालेराव यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी बाजार आवारात कांदा विक्रीस आणताना व्यवस्थितरित्या प्रतवारी करून आणावा असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले आहे.