
मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गरजेचे असलेले पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आहे. या कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेली सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने देणे गरजेचे आहे. https://t.co/y7jDXlT7Rn
— Supriya Sule (@supriya_sule) January 20, 2023
”मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेली सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने देणे गरजेचे आहे. यासोबतच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे हे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत”, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
यासोबतच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे हे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असून एक एक मंत्री सहा ते सात खाती सांभाळत आहे तर पाच-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे.यामुळे कामे अतिशय धीम्या गतीने होत आहेत.
— Supriya Sule (@supriya_sule) January 20, 2023
”मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असून एक एक मंत्री सहा ते सात खाती सांभाळत आहे तर पाच-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे. यामुळे कामे अतिशय धीम्या गतीने होत आहेत. याशिवाय मंत्री देखील क्वचितच मंत्रालयात उपलब्ध असतात. या सर्वांवर कडी म्हणजे आता पास देखील बंद आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना नम्र विनंती आहे की कृपया यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
याशिवाय मंत्री देखील क्वचितच मंत्रालयात उपलब्ध असतात. या सर्वांवर कडी म्हणजे आता पास देखील बंद आहेत.
माझी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना नम्र विनंती आहे की कृपया यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा.@CMOMaharashtra @mieknathshinde
— Supriya Sule (@supriya_sule) January 20, 2023






























































