
सामना ऑनलाईन : पुणे
नक्षल समर्थक असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी करून 6 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. या कारवाईत अनेक महत्वाची कागदपत्रे आणि साहित्य सापडले असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे नक्षल समर्थक ग्रेनेड लाँचरसह आणखी घातक शस्त्रे विकत घेण्याच्या तयारीत होते. यामध्ये जे ग्रेनेड लाँचर विकत घ्यायचे होते त्याचा फोटोसह माहितीपत्र पोलिसांच्या छाप्यात सापडली आहे. वरावर राव यांच्यावर शस्त्रास्त्र खरेदीची जबाबदारी होती असाही दावा पोलिसांनी केला आहे.
भीमा-कोरेगाव दंगल भडकवण्यासाठी 5 लाख रुपये दिले, पोलिसांचा गौप्यस्फोट
दरम्यान, देशात हिंसाचार घडवून अराजकता माजवण्याचा मोओवाद्यांचा मोठा कट होता असे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.






























































