आश्वासन पाळले नाही! मराठा क्रांती मोर्चाचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  मुंबई

मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र आश्वासन पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने येत्या 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने याप्रकरणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सायंकाळी विभागीय आयुक्तांना एक निवेदन दिले. 8 ऑगस्टपूर्वी आमच्या मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर 9 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

जिह्यामध्ये अद्यापि वसतिगृहांची सुविधा नाही

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रत्येक जिह्यात वसतिगृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. हे आश्वासन सरकारने अद्याप पाळलेले नाही. याबाबतही मराठा क्रांती मोर्चाच्या निवेदनात म्हटले आहे.

या मागण्यांसाठी निदर्शने

  • मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या 42 जणांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई, तसेच प्रत्येकाच्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी.
  • 13 हजार 700 आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबाजवणी करणे.
  • मराठा समाजातील लोकांना अनेक राष्ट्रीय बँका कर्ज देण्याबाबत सहकार्य करत नाहीत. याबाबत निर्णय घेणे.