आरक्षण मंजूर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही! मराठा मोर्चा मागण्यावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवल्यानंतर आता सभागृहात अहवाल मांडण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यभर संवाद यात्रा करत मराठा मोर्चाचे कार्यकर्ते हे आझाद मैदानात पोहोचले आहेत. जोपर्यंत एक मताने मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे.

मराठा समाजाला कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवे आहे. त्यामुळे सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. सरकारने देखील याच अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर करावे, तसेच आरक्षणाच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत अशा मागण्यांचा पुनरुच्चार यावेळी आंदोलकांनी केला.