फडणवीसांची जिरवणार भाजपचे सर्व आमदार पाडणार; जरांगेंचा इशारा, 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण

राज्यात जातीय विद्वेषाचे वातावरण निर्माण होण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. मराठा आरक्षणात अडथळे आणणाऱ्या फडणवीसांची जिरवणारच, भाजपचे सर्व आमदार पाडणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला महिनाभराची मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला आज वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने गोदाकाठावरील 123 गावांची आंतरवालीत बैठक  बोलावण्यात आली होती. या बैठकीत आंदोलनाची समीक्षा करण्यात आली.