38 पैकी 31 जिल्ह्यातील पाणी पिण्यायोग्य नाही, धक्कादायक अहवालानंतर बिहारमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये भूजल पातळी आणि पाण्याची गुणवत्ता याबाबत करण्यात आलेल्या सर्वोक्षणाचा धक्कादायक अहवाल आला आहे. भूजल पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचे समोर आले असून 38 पैकी 31 जिल्ह्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. राज्य आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. राजधानी पटणाचाही यामध्ये समावेश असल्यामुळे नितीश कुमार सरकारमध्ये हडकंप उडाला आहे.

विधासनभेमध्ये भूजल पाण्याची पातळी आणि गुणवत्ता याबाबत एक अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यात 38 पैकी 31 जिल्ह्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे. या पाण्यामध्ये आर्सेनिक, फ्लोराईड आणि आयर्न यांचे अतिरिक्त प्रमाण सापडले आहे. ज्या 31 जिल्ह्यांचा यात उल्लेख करण्यात आला आहे त्यात बिहारची राजधानी पटणासह बेगूसराय, भागलपूर, भोजपूर, बक्सर, दरभंगा, कटिहार, खगड़िया, लखीसराय, मुंगेर, समस्तीपूर, सारण , सीतामढी, वैशाली, औरंगाबाद, बांका, भागलपूर, गया , जमुई, कैमूर, मुंगेर, नालंदा, रोहतास, शेखपुरा, नवादा आणि अररिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, अनेक भागातील पाण्यामध्ये विषारी तत्वे आढळील आहेत. जवळपास 30 हजार 272 ग्रामिण वॉर्डमधील भूजल रासायनिक पदार्थांमध्ये प्रदुषित झाले आहे. गंगा नदी किनारील 14 जिल्ह्यातील एकूण 4742 ग्रामीण वॉर्डमध्ये आर्सेनिकयुक्त पाणी सापडले असून 11 जिल्ह्यातील 3791 ग्रामीण वॉर्डातील पाणी फ्रोराईडने प्रदुषित आहेत. काही जिल्ह्यातील पाण्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात आयर्न सापडले आहे. दुषित पाण्यामुळे त्वचाविकार, किडनी आणि अन्य विधी जडू शकतात.