एमबीए-एमएमएस सीईटीत सात विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यवस्थापन घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात सात विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे.

हर्षिता पांडे, प्रथम सिंग, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंडल, लक्षिता चांडलिया, शश्वी शाह यांनी या सीईटीत अव्वल कामगिरी केली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एप्रिल महिन्यात ही परीक्षा घेतली होती. राज्यभरातून एक लाख 57 हजार 281 विद्यार्थ्यांनी याकरिता नोंदणी केली होती. यापैकी एक लाख 29 हजार 131 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. आता 1 ते 3 एप्रिलदरम्यान ही परीक्षा झाली होती.

28 सदोष प्रश्नांकरिता एक गुण

एमबीए-एमएमएस सीईटीत तब्बल 28 प्रश्न सदोष असल्याचे आढळून आल्याने त्याकरिता सीईटी-सेलला विद्यार्थ्यांना एक गुण द्यावा लागला होता. त्यामुळे सीईटीचा निकाल वाढल्याचे दिसून येते.