कोंढव्यात पावणेदोन लाखांची एमडी पावडर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील कोंढव्यात मेफेड्रोन (एम.डी) विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

रिहान इलियास खान (19, रा. कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे हे आपल्या पथकासह कोंढवा परिसरात गस्तीवर होते. या दरम्यान कोंढव्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात रिहान खान हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमलदार साहिल शेख व अझीम शेख यांना मिळाली. यानूसार रिहानला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ९ ग्रॅम पावडर जप्त करण्यात आली.