सव्वा तीन कोटींच्या बसस्थानकाची मेहकरात पुनर्बांधणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mehkar-bus-stand

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी मंजूर करून घेतलेल्या 3 कोटी 55 लाख रुपयांच्या मेहकर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे.

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून मेहकर बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 3 कोटी 25 लाख रुपये मंजूर करून घेतले होते. मेहकर बसस्थानक मेहकर, लोणार, व सिंदखेडराजा या तीन तालुक्याला बससेवा देते. त्यामुळे या बसस्थानक मध्ये दिवसभरात जवळपास 90 शेड्युल होतात. या बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झाली होती. आता जुनी इमारत पाडण्यात आली आहे व त्या जागेवर दोन मजली सुसज्ज बसस्थानक उभे होणार आहे. सध्या पूर्व दिशेला बसेस प्लॅटफॉर्म होते ते आता पश्चिमेला असणार आहे. या दोन मजली इमारतीत वाहतूक नियंत्रण कक्ष, स्थानक प्रमुख कक्ष, हिरकणी कक्ष, दुकाने व वरील मजल्यावर रोकड कक्ष, विश्रांती कक्ष राहणार आहे. सृष्टी कन्स्ट्रक्शन, दे.राजा हे काम करत असून बांधकाम कालावधी एक वर्षे असल्याचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी सांगितले.