मेहुल चोक्सीने केली पंतप्रधानांवर पीएचडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi

सामना ऑनलाईन । गांधीनगर

मथळा वाचून आश्चर्यचकीत झालात ना? मेहुल चोक्सी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडी? कसं काय शक्य आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्की पडले असतील. पण, हो, हे खरं आहे. फक्त हा मेहुल चोक्सी हा हिरेव्यापारी चोक्सी नसून गुजरातमधील एक तरुण आहे.

सूरत येथील विद्यार्थी असलेल्या मेहुल चोक्सी या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रबंध (पीएचडी) पूर्ण केली आहे. मेहुल हा राज्यशास्त्राचा पदवीधर असून त्याने वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात आपला प्रबंध सादर केला आहे. लीडरशीप अंडर गव्हर्नमेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी असं त्याच्या प्रबंधाचं नाव आहे.

या प्रबंधासाठी त्याने साडेचारशे लोकांशी संवाद साधून अहवाल तयार केले. यात अनेक सरकारी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यांना नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारून त्याद्वारे मेहुल याने आपला प्रबंध तयार केला.