खासदार धैर्यशील माने हरविले आहेत; संतप्त मराठा आंदोलकांची पोलीस ठाण्यात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाकरून राज्यात वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यातील वातावरण तापले असताना, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. हातकणंगले तालुक्यात मराठा आंदोलकांनी खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. ‘खासदार धैर्यशील माने हरविले आहेत’, असे पोस्टर झळकावित तक्रार देण्यासाठी आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

‘सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा’; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

 

राज्यात आरक्षणाचा प्रश्न तापला असताना, खासदार धैर्यशील माने मतदारसंघात दिसत नाहीत. त्यामुळे वडगाव परिसरातील संतप्त मराठा समाजाच्या आंदोलकांनी खासदार धैर्यशील माने हरविले आहेत, ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घ्यावी, अशी मागणी करत पालिका चौक ते पोलीस ठाणे असा मोर्चा काढला. ‘आमचे खासदार हरवले आहेत. तक्रार दाखल करून घ्या’, अशी मागणी आंदोलकांनी पोलिसांकडे केली. पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत अशी अशी तक्रार दाखल करून घेता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलक पुन्हा पालिका चौकात आले. तेथे ‘खासदार हरविला आहे’, असे फलक झळकावित घोषणाबाजी केली. या फलकावर ‘आमचा खासदार हरवला आहे. त्यांचे नाव धैर्यशील माने असून, कर्ण गोरा, दाढी वाढवलेली आहे. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. कुठे सापडल्यास मतदारसंघात पाठवणी करावी.’ दरम्यान, हा फलक पोलिसांनी जप्त केला.