झोपेमुळे वाढते स्मरणशक्ती

86

सामना ऑनलाईन । टोरोन्टो

अभ्यास करायला सुरुवात केली की, हमखास डोळे पेंगतात. झोपेमुळे असा अभ्यासाचा खेळखंडोबा होत असला तरी अभ्यासानंतर घेतलेल्या थोड्याशा झोपेमुळे स्मरणशक्ती वाढायला मदत होते असा निष्कर्ष नुकताच येथील संशोधकांनी काढला आहे. गेल्या अनेक दशकांपासून झोप आणि स्मरणशक्ती यावर अभ्यास सुरू आहे. झोपेमुळे वाढणाऱ्या स्मरणशक्तीबद्दल टोरोन्टो येथील ‘न्युरोइमेज’ या जर्नलमध्ये माहिती प्रसिद्ध झाली आहे. मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या कायम लक्षात राहण्यासाठी अभ्यासानंतर झोप आवश्यक आहे. कारण झोपेमध्येच काही गोष्टी आपल्या स्मरणात फिट बसतात असा निष्कर्ष वॅâनडातील कॉनकॉर्डिया विद्यापीठ आणि बेल्जियमच्या लेज विद्यापीठातील संशोधकांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. या झोपेबद्दल ‘गाढ झोप नव्हे, थोडीशी झोप’ असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या