
हिंदुस्थानी मर्चंट नेव्ही अधिकारी संतोष द्विवेदी हा 7 मे रोजी पेनसिल्व्हेनियाच्या बंदरावर त्याची बोट पोहोचली तेव्हा तो जवळच्या मॉलमध्ये गेला, परंतु तेथून तो बेपत्ता झाला आहे. मनीष हा व्यावसायिक जहाजावर सेकंड ऑफिसर या पदावर काम करत होता. आपल्या एकुलत्या एक मुलाला शोधण्यासाठी द्विवेदी कुटुंबीय सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खेटे मारत आहेत.


























































