
सामना प्रतिनिधी । मुंबई
म्हाडाच्या 1385 घरांसाठीची लॉटरी जाहीर झाली असून 5 नोव्हेंबरला धनत्रयोदशीपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. या लॉटरीचा निकाल पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला लागणार आहे.
लॉटरीतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे. लॉटरीतील अत्यल्प गटातील घराची किंमत 20 लाख व त्यापेक्षा कमी आहे. तर अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 20 ते 35 लाख इतकी आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी 35 ते 60 लाख तर उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती 60 लाखांपेक्षा जास्त आहेत.
- लॉटरीतील म्हाडाचे सर्वात कमी किमतीचे घर 14 लाख 62 हजारांपर्यंतचे आहे तर सर्वात महाग घर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील असून या घराची किंमत 5 कोटी 80 लाख इतकी आहे.
- अत्यल्प गटासाठी उत्पन्न मर्यादा 25 हजार, अल्प गटासाठी 25 ते 50 हजार आणि मध्यम गटासाठी 50 ते 75 हजार प्रतिमहिना इतकी आहे.
- 1112 घरांना ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळाले असून 263 घरांचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.





























































