गिरणी कामगारांसाठी म्हाडा कल्याणमध्ये बांधणार 4500 घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

गिरणी कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कल्याणजवळील हेदुटणे येथील 4.7 हेक्टर जमीन जिल्हाधिकाऱयांकडून लवकरच म्हाडाला सुपुर्द केली जाणार आहे. या जागेवर गिरणी कामगारांसाठी तब्बल 4500 घरे उभारण्यात येणार आहेत.

जमीन ताब्यात आल्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर निविदा काढली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱयाने दिली. दीड लाखांपैकी आतापर्यंत 15 हजार कामगारांनाच घरे मिळाली आहेत.