राज्यातील तापमान दोन दिवसात घसरणार; सरासरी तापमानात वाढ होण्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

राज्यातील तापमानात आठवड्याभरापासून वाढ होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जाणवणारे उन्हाचे चटके आता फेब्रुवारीतचज जाणवायला लागले आहेत. मात्र, आता येत्या दोन दिवसात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमान पुन्हा घसरत आहे. राज्यात काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली उतरला आहे. मंगळवारी किमान तापमान 9.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात निचांकी तापमान जळगाव येथे 7.5 अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर मात्र राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थांबला आहे. मात्र, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दिवसाचे तापमान (कमाल) वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे निरभ्र वातावरणामुळेही सूर्यकिरणे थेट जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुपारच्या उन्हाचा चटका वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे 38.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.