
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून देशभरात राजकीय वारे वाहू लागले आहे. निवडणुकीमध्ये आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेडगे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गांधी कुटुंबावर निशाणा साधताना हेडगे यांनी राहुल गांधी यांना ‘विदेशी’ म्हटले. तसेच मुस्लिम वडील व ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो? असा सवालही त्यांनी पुन्हा उपस्थित केला.
#WATCH: Union Minister Ananth Hegde says on Rahul Gandhi, “They want proof of surgical strikes even when whole world acknowledged it. This Muslim who calls himself a ‘janeudhari Hindu’, son of a Muslim father & a Christian mother, does he have proof that he is a Hindu”? (10.3.19) pic.twitter.com/FWXFky5jXH
— ANI (@ANI) March 11, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. यात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार झाले. य़ा हल्ल्याचे राजकारण करताना काँग्रेसने या हल्ल्याचे आणि मेलेल्या दहशतवाद्याच्या आकड्यांचे पुरावे मागितले होते. यावर टीका करताना हेडगे म्हणाले की, एका मुसलमानाचा मुलाग ब्राह्मण कसा होऊ शकतो? स्वत: ला ब्राह्मण सिद्ध करण्यासाठी राहुल गांधी डीएनए टेस्ट करून पुरावा देतील का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रविवारी कर्नाटकमध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

बालाकोटमध्ये हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकनंत संपूर्ण जग आपल्या ताकदीचे आणि शौर्याचे गोडवे गात आहे. परंतु हे लोक (काँग्रेस) हिंदुस्थानी वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. परंतु एक मुसलमानाचा मुलगा ब्राह्मण कसा झाला? तसेच यावेळी हेडगे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख विदेशी असाही केला. गांधींचे वंशज स्वत:ला ब्राह्मण सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्ट करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.+
काँग्रेस आमदाराची पंतप्रधान मोदींवर अश्लाघ्य भाषेत टीका
वादग्रस्त हेगडे
वादग्रस्त विधान करण्याची हेगडेंची ही पहिली वेळ नाही. जानेवारीमध्ये याच आशयाचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तर 2017 मध्ये आपण संविधान बदलू असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच हिंदु मुलीचा हात धरणार्या मुलाचे हात वाचले नाही पाहिजे असेही वादग्रस्त वक्त्यव्य त्यांनी केले होते.




























































