महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा ‘हा’ दिवस – यशोमती ठाकूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेचे मतदान झाल्यानंतर सैरभैर झालेल्या भाजप नेत्यांनी आपला पराभव दिसू लागताच रडीचा डाव सुरू केला आहे. मविआच्या काही आमदारांच्या मतदान प्रक्रियेला आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने धाव घेतली होती. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत मतमोजणी लटकली होती. यावरून महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

”महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा ‘हा’ दिवस आहे. राज्यात आधीही निवडणूका झाल्या पण याप्रकारे कुणीही लोकशाहीला वेठीस धरले नाही. भाजप सारखं कृत्य कुणीही केलेलं नाही. त्यांनी मतमोजणी थांबवली. त्यांनी मतदान थांबवलं हे कृत्य लोकशाहीला थप्पड मारणारं होतं. त्यासाठी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. अशा डावपेचांचा कसा सामना करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे, अशा शब्दात महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपला फटकारले आहे.