अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविणाऱयास पोलिसांनी शोधून काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱया मजनुला माटुंगा पोलिसांनी इन्स्टाग्रामच्या मदतीने शोधून काढले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली आहे.

13 मार्च रोजी माटुंगा येथून मुलीला फूस लावून एका तरुणाने पळवून नेले होते. त्यानंतर मुलीच्या भावाने तक्रार देऊन आदित्य नलावडे या तरुणावर संशय व्यक्त केला होता. तेव्हा पासून वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धिरज गवारे तसेच संतोष पवार, राहूल चतुर आणि सुनीता कांबळे हे पथक आदित्यचा शोध घेत होते.

पण आदित्यने मोबाईल बंद ठेवल्याने त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. अखेर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शोध घेतला असता आदित्य नांदेड येथील धर्माबाद तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले.