मुंबईत एका अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मुंबईत ही घटना घडली असून या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती.
बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी महलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला आहे.
भायखळ्यात राहणाऱ्या एका मुलीची इन्स्टाग्रामवरून एका तरुणाशी ओळख झाली होती. दोघांचे वय 17 होते. मुलाने या मुलीला एका निर्जन ठिकाणी बोलावले. त्यानंतर या मुलाने तरुणीवर बलत्कार केला. मुलीने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. तेव्हा कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.