मोबाईलवर सारखी पाहत होती व्हिडीओ, आई ओरडल्यावर अल्पवयीन मुलीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत एक १४ वर्षाची मुलगी सारखी मोबाईलवर व्हिडीओ पाहत होती. जेव्हा आई तिला ओरडली तेव्हा तिने आत्महत्या केली. भोईवाडामधील ही घटना असून मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगी सारखी फोनवर असायची. सारखी फोनवर व्हिडीओ पहायची आणि कधी कधी व्हिडीओ उपलोडही करायची. गेल्या बुधवारी आईने कंटाळून तिला ओरडली. तेव्हा वाईट वाटून यामुलीने शौचालयात स्वतःला कोंडून घेतले. बर्‍याच वेळानंतर जेव्हा ती बाहेर नाही तेव्हा घरच्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला. तेव्हा मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

मुलीचा श्वासोच्छवास सुरू होता, तत्काळ तिला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. चार दिवसाच्या उपचारानंतर रविवारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.