अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ फेसबूकवर टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडोओ मोबाईलवरुन फेसबुकवर टाकल्या प्रकरणी एका विरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीस नाईक संतोष बाळासाहेब देवडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, फेसबुकवर मोबाईलद्वारे एका अल्पवयीन मुलीचे दोन अश्लील व्हिडीओ टाकण्यात आलेले होते. दिल्ली येथील हे प्रकरण असून या संदर्भातील माहिती मुंबई येथील महाराष्ट्र सायबर शाखेस कळविण्यात आलेली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन अधिक चौकशी केली असता लातूर येथील मळवटीरोड भागातून वापरल्या जाणाऱ्या एका मोबाईलमधून हे दोन अश्लील व्हिडीओ फेसबुकवर टाकण्यात आलेले होते. फेसबुकवापरकर्ता संशयीत इलियास याच्या विरुद्ध विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.