गांजा तस्करीप्रकरणी ‘मिस केरळ’ला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायड्रोपॉनिक गांजा तस्करीच्या आरोपाखाली महिलेला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. हर्षा सनी असे अटक महिलेचे नाव असून ती ‘मिस केरळ’ म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून 11.824 किलो गांजा जप्त केला. याची किंमत सुमारे 11.82 कोटी इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अॅडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (एपीआयएस) बसवण्यात आली आहे. त्या यंत्रणेद्वारे प्रोफाईलिंग आधारे एआययूच्या पथकाने हर्षाला ताब्यात घेतले. तिला चौकशीसाठी थांबवण्यात आले. तिच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता त्यात 12 हिरवट रंगाचा पदार्थ असलेली पाकिटे सापडली. ती पाकिटे एनडीपीएस किटच्या सहाय्याने तपासणी केली असता तो गांजा असल्याचे उघड झाले.