
सामना प्रतिनिधी, कळवण
शहरातील रामनगर भागातील संजय ज्ञानदेव राठोड यांच्याकडे दिवाळी सणासाठी आलेल्या नातवाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत गणेश गंगाधर शिंदे (वय 7 वर्षे) हा दिवाळी सणाच्या सुट्टीत आजोबा संजय ज्ञानदेव राठोड यांच्या घरी आला होता. गुरुवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी मित्रांसमवेत खेळण्यास गेला होता. सायंकाळी घरी आला नसल्याने गणेश बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
शोधकार्य सुरू असताना काल 10 नोव्हेंबर रोजी रामनगर शिवारातील बाबाच्या मठातील जुन्या पडीक विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. आज सकाळी कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन कळवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
summary- missing kid found dead in well




























































