जयदत्त क्षीरसागर झाले भावूक, दिव्यानेच चटके दिल्याची व्यक्त केली खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

राजकीय जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेण्यासाठी जयदत्त क्षीरसागर शुक्रवारी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत आहेत. गुरुवारी त्यांनी आपल्या फेजबुक पेजवर मूठ आवळलेली प्रतिमा टाकून ‘वादळात ज्या दिव्याची काळजी घेतली तोच दिवा चटके देत आहे’, अशी भावना व्यक्त केली. 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जयदत्त क्षीरसागर पाहिल्यादाच भावूक झाले आहेत. त्यांनी कोणत्या दिव्याची काळजी घेतली, त्यांना कोणी चटके दिले, याचे स्पष्टीकरण ते शुक्रवारी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करू शकतात.

बीडमध्ये काकांची कोंडी करण्यासाठी पुतण्याचा गट सरसावला

जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीतील मोठे प्रस्थ. काँग्रेस सोडून पवारासोबत राष्ट्रवादीमध्ये आले माजी खासदार स्व. केशर काकू सोबत राजकारणाचे धडे गिरवले. क्षीरसागर कुटुंबीयाची राजकीय कमान खांद्यावर घेतली. एकीकडे विरोधकांसोबत दोन हात करत असताना पक्षात नेहमीच त्यांना अजित दादा यांच्या गटाकडून मानहानी स्वीकारावी लागली तरी आपल्या चातुर्यावर आणि जिल्ह्यातील आपल्या ताकदीवर स्वपक्षातील द्वेष करणाऱ्याचा सामना समर्थपणे केला. काळाच्या ओघात डाव पालटला व पुतण्या संदीप क्षीरसागरांनी आपला अधिकार मागितला आणि क्षीरसागर कुटुंबात महाभारत सुरू झाले. हा वाद तात्पुरता असू शकतो हीच भावना जिल्हावासीयांची होती मात्र हा कौटुंबिक वाद विकोपाला गेला.

संदीप क्षीरसागर यांनीही स्वकर्तुत्वाने आपलं स्थान राष्ट्रवादीत बळकट केले. पक्षांतर वादात मान अपमान नाट्य सुरू झाले. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी पासून जसे दूर जाऊ लागले तसे संदीप क्षीरसागर अजित दादाच्या ‘गुड बुक’मध्ये येऊ लागले. अखेर या कौटुंबिक वादात राजकीय भिंत उभी राहिली व राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागरांना दुर्लक्षित केल्याने त्यांना निर्णय घेणे भाग पाडले. शुक्रवारी ते आपला निर्णय जाहीर करतील किंवा या लोकसभा निवडणुकीत आपला पाठींबा जाहीर करतील.