
उदय जोशी । बीड
दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल अधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्याना आजच्या आढावा बैठकीत दिला. यावेळी आमदार सुरेश धस कडाडले. चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं म्हणत त्यांनी हा अहवाल चुकीचा असल्याचे सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड मध्ये दाखल झाले आहेत. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना बीडमधील सद्य परिस्थिती आणि करण्यात आलेल्या उपाय योजना यांची माहिती दिली.




























































