पाण्याची चिंता मिटणार; मोडक-सागर ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणार पहिला तलाव भरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modak-sagar-mumbai

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3,850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज दुपारी 01.04 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच सन 2021 मध्ये 22 जुलै 2021 रोजी मध्यरात्री 03.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच सन 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 09.24 वाजता, वर्ष 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन 2018 व 2017 असे दोन्ही वर्ष हा तलाव 15 जुलै रोजी आणि सन 2016 मध्ये 01 ऑगस्ट रोजी पूर्ण भरून वाहू लागला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

पाण्याची चिंता मिटणार; मोडक-सागर ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणार पहिला तलाव भरला

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3,850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे 6.00 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 81152.20 कोटी लीटर (8,11,522 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 56.07 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 43.72 टक्के अर्थात 9926.80 कोटी लीटर (99,268 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.79 टक्के अर्थात 9689.40 कोटी लीटर (96,894 दशलक्ष लीटर), ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 53.90 टक्के अर्थात 10432.20 कोटी लीटर (1,04,322 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.06 टक्के अर्थात 36611.30 कोटी लीटर (3,66,113 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 53.18 टक्के अर्थात 1473 कोटी लीटर (14,730 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 76.08 टक्के अर्थात 612.10 कोटी लीटर (6,121 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.