‘काम हवंय तर आधी कपडे उतरव’, मॉडेलचा चित्रपट निर्माता साजिद खानवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपूर्वी हॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये Me Too वादळाने धुमाकूळ घातला होता. अनेक आघाडीच्या कलाकारांवर मॉडेल, अभिनेत्री यांनी गंभीर आरोप केले होते. याचा फटका अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांना बसला होता आणि त्यांच्या हातातून मोठ-मोठे प्रोजेक्स्ट सुटले होते. आताही ही चळवळ पुन्हा सुरू झाली असून आघाडीचा चित्रपट निर्माता साजिद खान याच्यावर प्रसिद्ध मॉडेलने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

मॉडेल पाउला (Dimple Paul) हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहून साजिद खान याच्यावर ‘कामासाठी कपडे उतवावे लागतील’, असे म्हटल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाउला आपल्या पोस्टमध्ये म्हणते, #MeToo चळवळ सुरू झालेली तेव्हा अनेकांनी साजिद खान याच्याबाबत खुलासे केले. मात्र त्यावेळी मला असे करण्याची हिंमत झाली नाही, कारण इतर कलाकारांप्रमाणे माझ्याकडे गॉडफादर नाही, त्यामुळे मी कुटूंबासाठी कमावण्याच्या इराद्याने गप्प राहिली. मात्र आता माझे आई-वडील माझ्यासोबत नसून मी फक्त स्वतःसाठी कमावत आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की 17 वर्षांची असताना साजिद खान याने माझ्यासोबत गैरवर्तन केले होते.

img_20200911_153406

पाउला पुढे म्हणते, त्याने त्यावेळी माझ्यासोबत अश्लील संभाषण केले, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर साजिद खान याने मला विवस्त्र हो असेही सांगितले. हाऊसफुल चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्याने हे सर्व केले.

pamla-sandesh

देव जानो त्याने असे किती मुलींसोबत केले असेल, असेही ती म्हणाली. तसेच त्यावेळी मी लहान असल्याने मौन होते, मात्र आता मला माझ्यासोबत घडलेल्या घटनेचे गांभीर्य कळले म्हणून की समोर आली आहे, असेही पाउला म्हणाली. तसेच फक्त कास्टिंग काऊच नाही तर लोकांना फुस लावून त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याच्या आरोपाखाली अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवे, असेही पाउला आल्या पोस्टमध्ये म्हणते.

img_20200911_153424

दरम्यान, साजिद खान याच्यावर असे आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधी #MeToo चळवळ सुरू झालेली तेव्हा एका महिला पत्रकाराने सर्वात आधी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्री सलोनी चोप्रा, रशेल वाइट, सिमरन सूरी यांनीही त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. यामुळे IFTDA ने साजिदला 1 वर्षांसाठी निलंबित केले होते.