बिल्कूल रिक्स नही लेने का! कमेंट सेक्शन बंद करून मोदींनी केली ‘मन की बात’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mann-ki-baat-modi-pm

आज पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. परंतु त्यांनी यावेळी युट्युब चॅनेलवरील कमेंट सेक्शन बंद करून संवाद साधला. गेल्या वेळी जेव्हा मोदी यांनी मन की बात मधून जनतेला संबोधन केले तेव्हा नेटकर्‍यांनी डिसलाईक्सचा पाऊस पाडून कमेंट सेक्शनमधून ट्रोल केले होते. तेव्हापासून मोदींनी धोका न पत्करण्याचे ठरवले आहे.

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम पंतप्रधान कार्यालय, डीडी न्युज, पीआयबी इंडिया, राज्यसभा टीव्ही या सरकारी युट्युब चॅनलवरून प्रसारित केला जातो. तसेच भाजपचे अधिकृत चॅनेल, मोदी यांचे युट्युब चॅनेल वरूनही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाते. त्यात पंतप्रधान कार्यालयाच्या युट्युब चॅनलवर मन की बातवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे. जेव्हा सर्व चॅनेलवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लाईव्ह सुरू होते तेव्हा कमेंट सेक्शन बंदच करण्यात आले होते, आता पीएमओ आणि डीडी न्युज सर्च चॅनेलवर कमेंट सेक्शन सुरू करण्यात आले आहेत.

man-ki-baat-dd-news

डिसलाईकचा पाऊस

एकूण पाच चॅनेलपैकी चार चॅनेलवरील कमेंट सेक्शन जरी सुरु झाले असले तरी नेटकर्‍यांनी मन की बातच्या कार्यक्रमावर डिसलाईकचा पाऊस पाडला आहे. पीएमओ मन की बात कार्यक्रमावर एक हजार 200 डिसलाईक आले आहेत. राज्यसभेच्या चॅनेलवर 204 डिसलाईक तर 94 लाईक्स आले आहेत. तर पीआयबी इंडियाच्या चॅनेलवर 842 डिसलाईक तर 551 लाईक्स आले आहेत. भाजपच्या चॅनेलवर लाईक्स डिसलाईक्सची संख्या लपवण्यात आली आहे.

मोदी ट्रोल

ज्या चॅनेलवर कमेंट सेक्शन सुरु आहे तिथे नेटकर्‍यांनी मोदींना ट्रोल केले आहे. काही पेट्रोल डिझेलवरी किंमतीवरून सुनावले आहे, तर काहींनी कोरोना लसींवरून सुनावले आहे. मोदी फक्त बोलतात पण काही काम नाही करत असे म्हणूनही नेटकर्‍यांनी मोदींना ट्रोल केले आहे.