
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोदी 2.0 सरकारचे पहिले संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 17 जून 26 जुलैदरम्यान होणार असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने खात्रीलायक सुत्रांच्या आधारे म्हटले आहे.तसेच लोकसभेच्या अध्यक्षांची निवड 19 जूनला होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Sources: Parliament session for budget to be held from 17th June to 26th July.
Election for Speaker will be on 19th June. pic.twitter.com/UrRFHjrJHh— ANI (@ANI) May 31, 2019
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. 30 मे रोजी नव्या सरकारमधील मंत्र्याचा शपथविधी झाला. नंतर 31 मे रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.























































