लोकशाहीवर बोलण्याचा मोदींना अधिकार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अशोक चव्हाण - 1) 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009, 2) 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । मुंबई

मागील चार वर्षांपासून देशावर अघोषित आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. एकंदरीतच आज देशात आणीबाणीची परिस्थिती असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.