हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना दि.२९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन शेख मुशरफ शेख महेबूब रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सीमकार्ड सापडल्याने तसेच एक पेन ड्रॉईव्ह सापडल्याने रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

किनवट तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी दि.२९ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर ते नांदेड असा प्रवास करत असताना रेल्वेच्या डब्यात बसलेल्या शेख मुशरफ शेख महेबूब रा.हिमायतनगर याने मुलीला स्वतःचा मोबाईल नंबर देत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपी शेख मुशरफ याच्या विरोधात कलम ३५४/३५४५ सह १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विविध वंâपन्यांची जवळपास पंधरा सीमकार्ड आढळून आले. पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयात हजर केले.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज या करीत आहेत. या युवकाकडे अनेक सीमकार्ड सापडल्याने त्याने आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात ओढले याचाही तपास पोलीस करीत आहेत. शिवसेनेचे गौतम जैन यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.