
मंगूस आणि साप हे एकमेकांचे प्राणघातक विरोधक आहेत. साप-मंगूस कधीच एका ठिकाणी सोबत राहत नाही, हे सर्वाना माहित आहे. मात्र कधीकधी दोघेही एकमेकांच्या समोरासमोर येतातच. त्यावेळी त्यांच्यात झुंज होणे निश्तिच आहे. अशाच एका झुंजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
42 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांना आपली शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे. कधी साप मुंगूसला डसण्याचा प्रयत्न करत आहे, तर कधी मुंगूस सापावर हल्ला करताना या व्हिडीओत दिसत आहे. मुंगूस आणि सापाच्या या युद्धात दोघेही एकमेकांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
النمس مع وجبة المفضله pic.twitter.com/RtesvhgLZz
— عالم الحيوانات المفترسة (@em4g1) March 27, 2021



























































