
धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह जिह्यात आजही पावसाची उघडझाप सुरूच होती. सर्व लहान-मोठी धरणे 98 ते 100 टक्के भरलेली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तिसऱयांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीचे पाणी आज दुसऱया दिवशीही पात्राबाहेरच होते. तर, जिह्यातील 31 बंधारे आजही पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उशिरापर्यंत उघडल्याने विसर्ग सुरू होता. सकाळी 31.2 फुटांवर गेलेल्या पंचगंगेच्या पातळीत आता घट होत असून, सायंकाळी चारच्या सुमारास 30.9 फूट झाली होती.
कोल्हापूर जिह्यात आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा महापुराची चिंता लागली होती. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग पाहता पंचगंगेच्या पातळीत वाढ होत होती. सध्या राधानगरी धरणाचा एकच स्वयंपूर्ण दरवाजा उघडा असून, त्यामधून 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू होता. आज दिवसभर जिह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होऊन पावसाची बुरबुर सुरू होती. जिह्यात 24 तासांत 8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
धरण पाणीसाठा विसर्ग
राधानगरी 98.29 3028
तुळशी 99.37 400
वारणा 99.58 4573
दूधगंगा 91.60 1470
कासारी 97.34 250
कडवी 99.62 200
कुंभी 97.40 300
पाटगाव 100 1334
चिकोत्रा 100 400
चित्री 100 370
जंगमहट्टी 100 984
घटप्रभा 100 2631
जांबरे 100 1018





























































