पाऊस पडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सावळदबारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सावळदबारा परिसरातील खरीप पिके धोक्यात आली होती; परंतु शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही शेतकऱ्यांनी सावळदबारा परिसरात दुबार पेरणी केली होती. परिसरात कोठे पाऊस पडत होता तर काही भागात पाऊस पडत नव्हता. शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पिकांना खते टाकण्याचे, फवारणीचे काम सुरू केले.

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उसनवारी करून केली आहे. मागील वर्षी कपाशीवर पडलेल्या बोंडअळीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. सावळदबारा परिसर डोंगर भाग असल्याने वन्य प्राण्यामुळे पिके धोक्यात आली. सावळदबारा परिसरातील शेतकरी पाऊस चालू असताना शेतात जाऊन पिके वाचविण्यासाठी शेतात फटाके फोडत आहे. वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव पाटील कोलते, गजानन दांडगे, दिनकर शिपलकर, विजय रावळकर, एकनाथ सपाटे, परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.