मोरेटोरियमच्या व्याजावरील व्याजाचे गणित, जाणून घ्या किती मिळणार कॅशबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी कर्जधारकांनी एक दिलासा देत मोरेटोरियमवरील व्याज माफ केले आहे. तसेच ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतला नाही त्यांच्या खात्यात या व्याजाची रक्कम म्हणजेच कॅशबॅक येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेशही जारी केले आहेत.

रिझर्व्ह बँकेने मार्च ते ऑगस्ट पर्यंत सहा महिन्यांसाठी मोरेटोरियम म्हणजेच हफ्ते पुढे ढकलण्याची सुविधा दिली होती. परंतु बँका या व्याजावरील व्याज आकारणार आहे. कर्जावरील हफ्ता भरता त्यात व्याजाची रक्कम मोठी असते, तसेच मोरेटोरियमची सुविधा दिल्यानंतर बँक चक्रवाढ व्याजही लावणार त्यामुळे कर्जधारक मोठ्या संकटात सापडले होते.

सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित असून दोन नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून 2 कोटी रुपयांपर्यंत कर्जावरील व्याजावरील व्याज स्वतः भरणार असल्याचे जाहीर केले होते. ही कार्यवाही लवकरात लवकर करावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणून केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच ही योजना लागू करून कर्जधारकांना ही भेट दिली आहे.

चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यांच्यातील फरक

सरकारने सांगितले की सहा महिन्यांतील मोरेटोरियम काळातील लावलेले चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यांच्यातील जी रक्कम असेल ती ग्राहकांना त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

कधी मिळतील पैसे

अर्थ मंत्रालयाच्या सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबर पर्यंत याबाबत सर्व कार्यवाही पूर्ण होईल. म्हणजेच पुढील आठवड्यातील गुरूवारी ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे मिळतील.

कुणाला होणार फायदा

एकूण 8 प्रकारच्या कर्जधारकांना या योजनेचा फायद होणार आहे. त्यात गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड धारकांचा समावेश आहे. 2 कोटी रुपये कर्ज असलेल्या ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

किती कॅशबॅक मिळणार

समजा तुम्ही 7.5 टक्के व्याज दरावर 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. चक्रवाढ व्याजदरानुसार एकूण एकूण व्याज हे 1 लाख 14 हजार 272 रुपये होतात. तर साधारण व्याजानुसार ही रक्कम 1 लाख 12 हजार 500 रुपये होतात. त्यानुसार तुमच्या खात्यात 1 हजार 772 रुपये येऊ शकतात.