मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाथर्डी तहसील कार्यलयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मानव हीत लोकशाही पार्टीच्या वतीने तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार मानदेव पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेक-यांनी समाजाच्या मागण्यांसाठी जलसमाधी घेणा-या संजयभाऊ ताकतोडे यांच्या वारसांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. मातंग समाजाच्या आरक्षणाची वर्गवारी व्हावी. आण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी मिळावा. तालुक्यातील मातंग समाजाचे गुन्हे निकाली काढावेत. दलित वस्तीची विकासाची कामे दलित वस्तीमधेच व्हावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दिलीप पवळे, बाबासाहेब दिनकर, संजय शिंदे, राँयल शिंदे, दत्तात्रय बिडवे, रवी शिरसाट, पप्पु लोंढे, खंडु दिनकर, विक्रम दिनकर, गोविंद दिनकर, दिगंबर दिनकर मच्छिंद्र कसबे, सुरेश नवगिरे, दिपक साळवे, गणेश पवळे कृष्णा शेरकर, शशिकांत काळोखे, भुजंग साठे, विश्वास नवगिरे यांच्यासह समाजातील युवक यावेळी उपस्थित होते. तहसिलदार नामदेव पाटील यांनी तुमच्या मागण्याचा अहवाल वरीष्ठ अधिका-यांना पाठवितो, असे आश्वासन दिले.