
छत्तीसगडच्या निर्मितीनंतर भाजपच्या काळात या राज्यात सर्वाधिक चर्च बनल्याचे खळबळजनक आरोप होत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मात्र आता सत्तेत नसल्याने ते धर्मांतरणाच्या मुद्द्याचा वापर करून सत्तेत परत येऊ पाहात आहेत, असेही ते म्हणाले.
छत्तीसगढ़ बनने के बाद सर्वाधिक चर्च भाजपा के शासनकाल में बने हैं। आज जब सत्ता में नहीं हैं तो उनको सत्ता में वापसी के लिए धर्मांतरण का सहारा चाहिए: छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल pic.twitter.com/S7aHJJy7bl
— ANI_HindiNews (@AHindinews) September 1, 2021
छत्तीसगडमध्ये धर्मांतरणावरून राजकारण ढवळले जात आहे. भाजपकडून काँग्रेसवर गंभीर आरोप झाले आहेत. काँग्रेसनेही आपली बाजू मांडण्यासाठी हाच मुद्दा आता भाजपच्या माथी मारत आपले हात वर केले आहेत. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्राधान्याने वापरला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.



























































